संधी मिळाल्यास वीट जिल्हापरिषद गटातून निवडणूक लढवू : गहिनीनाथ ननवरे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पाटील गटा तर्फे संधी मिळाल्यास वीट जिल्हापरिषद गटातून निवडणूक लढवू; असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी केले आहे.
श्री.ननवरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली ग्रामस्थां तर्फे सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभापती अतुल पाटील, युवा नेते पृथ्वीराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य बिभिषण आवटे उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. ननवरे म्हणाले, की पंचायत समितीच्या सभापती पदाची संधी माजी आमदार नारायण पाटील यांन दिली होती. त्या संधीचा पुरेपूर वापर तालुक्यातील जनतेला करून दिला आहे. एवढेच नाहीतर शासनाच्या सोयीसुविधांचा लाभ सर्वसामान्य जनते पर्यंत मिळवून दिला आहे. या अनुभवाचा फायदा जनतेला होण्यासाठी जिल्हा परिषद हे माध्यम चांगले आहे.
त्यामुळे उर्वरित विकासात्मक कामे करण्यासाठी वीट जिल्हापरिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी आपण इच्छूक आहे. पाटील गटाकडून संधी मिळाल्यास आपण त्या संधीचे सोने करून दाखवू, असेही आवाहन श्री.ननवरे यांनी दिले.
यावेळी माजी सरपंच नानासाहेब मोरे-पाटील, नारायण पाटील यांचे स्वीय सहाय्यक सुर्यकांत पाटील, सतीन कानगुडे, बिभिषण गव्हाणे, सुभाष जाधव, अशोक राऊत, नवनाथ जाधव, बिभिषण ढेरे, डॉ. भागवत ढेरे, हनुमंत ढेरे, वीटचे सरपंच उदय ढेरे, उपसरपंच समाधान कांबळे, संजय ढेरे, हेमंत आवटे, सुभाष आवटे, संतोष ढेरे, जगदीश निंबाळकर, गणेश जाधव, किसन जाधव, सुधीर आवटे, राहूल कानगुडे, आप्पासाहेब गणेशकर, वैभव कानगुडे, हनुमंत ननवरे, विनोद पडवळे, श्रीरंग शेळके, बाळासाहेब शिंदे, बंडू शिंदे, अतुल राखुंडे, उध्दव ढेरे, मारूती कानगुडे, शिवाजी कानगुडे, बापू कानगुडे, गोरख पवार, निवृत्ती पडवळे, दिनकर रायकर, दादासाहेब शिंदे, रविंद्र कानगुडे, धर्मराज राखुंडे, भास्कर कानगुडे, कल्याण शेळके, किसन चांदणे, विकास राखुंडे, संजय चौधरी, आण्णासाहेब शिंगाडे, राजेंद्र ढेरे, सचिन ढेरे, सौदागर बिचितकर, स्वप्निल पवार, बाळासाहेब चव्हाण, भुजंग ढेरे, गणेश गोसावी, गोकुळ कानगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.