केम-तुळजापूर एसटी २६ सप्टेंबरपासून सुरू होणार

karmala bus stand timetable

केम (प्रतिनिधी-संजय जाधव) :
केम-कुर्डुवाडी-तुळजापूर एसटी सोमवार दि २६ पासून घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार आहे, अशी माहिती कुर्डुवाडी आगारप्रमुख श्री. राठोड यांनी दिली.

ही गाडी केमहून सकाळी ८ वाजून ३० मि. निघेल व कुर्डुवाडी येथे ९:३० वा. पोहचेल. तेथून दहा मिनिटे थांबा घेऊन तुळजापूर येथे ११:३० पोहचेल. तुळजापूरहून दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान निघून सायंकाळी केम मुक्कामी येईल. सदर गाडी केम-कुर्डुवाडी एसटीच्या मार्गावर जा-ये करील.

ही गाडी चालू व्हावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिण रणश्रृंगारे, भाजप तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे व प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी केम ग्रामपंचायत ठराव व आमदार संजय मामा शिंदे यांची शिफारस घेऊन शिष्टमंडळ आगार प्रमुख यांना समक्ष भेटून निवेदन दिले होते.

या शिष्टमंडळात सचिन रणश्रृंगारे,धनजंय ताकमोगे सुहास वेदपाठक, संदिप तळेकर बाळू देवकर,जाधव एन डि सर होते. कुर्डुवाडी आगाराने नवरात्रात हि भेट दिली त्याबद्दल केम ग्रामस्थांच्या वतीने आगार प्रमुख श्री.राठोड, वाहन निरीक्षक श्री. हांडे, यांचे आभार मानले. या गाडिचे केम ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत केले जाणार आहे असे सचिन रणश्रृंगारे यांनी सांगितले.


Kem-Kurduwadi-Tuljapur ST will be started from Monday 26th on the auspicious occasion of ghatsthapana, said Kurduwadi Agar Pramukh Shri. Rathod| Kem News | Karmala News| Saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!