साखर कारखान्यानी एफआरपीची रक्कम त्वरीत द्यावी - स्वाभिमानीची मागणी - Saptahik Sandesh

साखर कारखान्यानी एफआरपीची रक्कम त्वरीत द्यावी – स्वाभिमानीची मागणी

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.22) :
तालुक्यातील साखर कारखान्याचा सन 2021-2022 चा हंगाम बंद होऊन सहा महीने झाले.तरीही कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. सध्या कारखान्याकडे शेतकऱ्यांची 13 ते 14 कोटी रुपये एफआरपीची बाकी आहे. ती त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,अन्यथा आम्हाला तीव्रआंदोलन करावे लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

याबाबत संघटनेचे वतीने तहसीलदार समीर माने यांना लेखीनिवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना 14 दिवसात देणे बंधनकारक असताना व सहा महीने उलटूनही कारखानदारांनी दिलेली नाही . मराठवाड्यातील कारखाने ऊसाला प्रती टन 2700 रूपये भाव देतात, कोल्हापूर, सांगली,सातारा 3000 रू भाव देत आहेत. परंतु करमाळा तालुक्यातील कारखानेच फक्त 2000/2200 रू भाव का देतात ..? याच गौडबंगाल काय आहे..? हे शेतकऱ्यांना समजल पाहिजे. याच उत्तर मकाई.कमलाई.भैरवनाथ. या तीन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले पाहिजे. पुढील हंगाम 15 दिवसात सुरू होत आहे.

तरी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम जमा करण्याचे आदेश कारखान्यांना देण्यात यावे.अंन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल व होणार्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील. असेही म्हटले आहे. मागणीचे निवेदन देतेना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष रवी गोडगे,करमाळा तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके.जिल्हाउपाध्यक्ष दीपक शिंदे.तालुका युवा अध्यक्ष अमोल घुमरे.तालुका पक्षाध्यक्ष बापू फरतडे, उपाध्यक्ष तानाजी शिंदे, युवा उपाध्यक्ष बापू वाडेकर.शाखा अध्यक्ष जातेगाव अशोक लवंगारे आदीजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!