पोथरे येथे कायदेविषयक शिबिर संपन्न - ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Saptahik Sandesh

पोथरे येथे कायदेविषयक शिबिर संपन्न – ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.23) :
पोथरे (ता.करमाळा) येथे आज (ता.२३) कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. यावेळी ॲड. विक्रम चौरे, ॲड.प्रशांत बागल, ॲड.कु.पाटील, ॲड.योगेश शिंपी, ॲड.राहुल सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ यांनी कायद्यातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले.


नागरिकांनी कायदा समजून घ्यावा – न्यायाधीश एखे
प्रत्येक व्यक्ती कायदेविषयक साक्षर झाली पाहिजे. कायदेविषयक साक्षरतेमुळे समाजात शांतता राखण्यास मदत होते व स्थैर्य लाभते. त्यामुळे फिरते लोकअदालत ही संकल्पना गाव पातळीपर्यंत आणली जाते. नागरिकांनी कायदेशीर ज्ञान प्राप्त करून आपली प्रगती करावी, असे अवाहन न्यायाधीश सौ.मीना ऐखे यांनी केले.

यावेळी सरपंच धनंजय झिंजाडे, उपसरपंच दिपाली जाधव , मजीसरपंच विष्णू रंधवे माजी उपसरपंच जयद्रथ शिंदे , संतोष वाळुंजकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी वकीलसंघाचे अध्यक्ष ॲड.विकास जरांडे,ॲड.अपर्णा पद्माळे, पी.के.पवार,एम.डी. कांबळे,ॲड.शिंगाडे, ॲड.ढेरे, ॲड. सचिन हिरडे, ॲड.अकाश मंगवडे उपस्थित होते.

यावेळी माजी सरपंच सोपानकाका शिंदे, चेअरमन प्रभाकर शिंदे, किसनराव शिंदे, आदिनाथचे संचालक प्रकाश झिंजाडे,माजी संचालक विठ्ठलराव शिंदे, सदस्य रघुवीर झिंजाडे, नानामहाज पठाडे, दत्तामहाराज नंदर्गे , कवी हरीभाऊ हिरडे, माजी सरपंच बबनराव नंदर्गे, ज्ञानदेव नायकोडे, सोमनाथ झिंजाडे,विशाल झिंजाडे, दत्ता वाळुंजकर, आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.डाॅ.बाबूराव हिरडे यांनी केले.सुत्रसंचालन व आभार ॲड. नानासाहेब शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत पोथरे, ग्रामसेवक हरीभाऊ दरवडे, सहाय्यक अधिक्षक कांबळे, समन्वयक रामेश्वर खराडे, आर. व्ही.शेंडगे, एन.के.मदने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!