'जुनी पेन्शन योजना लागू करावी' अशा मागणीचा गौरी गणपती देखावा सरपडोहच्या शिक्षक दाम्पत्यांनी साकारला - Saptahik Sandesh

‘जुनी पेन्शन योजना लागू करावी’ अशा मागणीचा गौरी गणपती देखावा सरपडोहच्या शिक्षक दाम्पत्यांनी साकारला

केम (प्रतिनिधी- संजय जाधव) : शासकिय सेवेत नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करणारा गौरी गणपतीचा देखावा सरपडोह( ता. करमाळा) येथील येथील रेणुका चौगुले व अरूण चौगुले या शिक्षक दांपत्याने केला आहे.

Chaugule sarapdoh karmala juni pension Yojana gauri ganpati dekhava

गौरी गणपतीच्या देखाव्यातून अनेक जण विविध संकल्पना मांडत असतात, सामाजिक संदेश देत असतात.सरपडोह येथील चौगुले परिवाराने गेल्यावर्षी देखील ऑनलाईन शिक्षणामुळे शाळा सुरू झालेले नव्हत्या, ऑनलाईन शिक्षणाचा देखावा आणि विद्यार्थ्यांना लागलेली शाळेची ओढ, हा संदेश गौराईतून दिलेला होता आणि यावर्षी त्यांनी शासकिय सेवेत नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षक कर्मचारी बांधवांना पेन्शन मिळावी यासाठी राज्यभर आणि देशभर जे आंदोलन चालू आहेत त्या आंदोलनाचा आवाज या गौराईच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहचावा यासाठी हा देखावा केला असल्याचे शिक्षिका रेणुका चौगुले यांनी सांगितले.

समान काम व समान दाम या संविधानातील तत्त्वांनुसार केंद्रीय कर्मचारी व राज्य कर्मचारी याना पेन्शन मिळाली पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु २००५ नंतरच्या सर्व कर्मचारी त्यांच्या म्हातारपणाचा व कुटूंबाचा आधार म्हणून पेन्शन मागणी करत आहेत. आम्हाला तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. आम्हाला पेन्शन देण्याची सद्बुद्धी या शासनाला येऊ द्यावी, म्हणून हा देखावा साजर केला आहे.
अरुण चौगुले, उपशिक्षक,(पेन्शन संघटना अध्यक्ष ), सरपडोह

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!