जयकुमार कांबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न - नेत्ररोग व रक्तदान शिबिरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद.. - Saptahik Sandesh

जयकुमार कांबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न – नेत्ररोग व रक्तदान शिबिरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरांमध्ये जयकुमार कांबळे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम व उपक्रमांनी संपन्न झाला, या उपक्रमात यावेळी नेत्ररोग शिबिर, रक्तदान शिबिर व महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उस्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेविका व महिला व बालकल्याण समितीच्या मा. सभापती सविताताई जयकुमार कांबळे, बौदाचार्य प्रशांत कांबळे, बौद्धाचार्य सावता हरी कांबळे यांनी केले. यावेळी रक्तदान शिबिर व नेञ रोग तपासणी शिबिराला बहुसंख्य नागरिकांनी प्रतिसाद दिला.

यावेळी जनतेचे नगरसेवक जयकुमार भाऊ कांबळे यांचा विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका सविताताई जयकुमार कांबळे, डॉ.राहुल जाधव, प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे, मंगेश ओहोळ, स्वप्निल धाकतोडे, आकाश दामोदरे, बबलू गायकवाड, अक्षय बनसोडे, रोहन शेवाळे, सनी कांबळे, भैया कांबळे, राहुल कांबळे, समीर शेख, फारूक बेग, मेणुद्दीन भाई शेख, पप्पू पठाण, समीर मुलानी, आयाज शेख, सचिन माने, राजू पवार, विजू पवार, नितीन कांबळे, कृष्णा कांबळे, सुरज पठाण, अरबाज शेख, राजे भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार आर.के.कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!