नेरले येथे मराठा आरक्षण महामोर्चासाठी बैठक संपन्न - Saptahik Sandesh

नेरले येथे मराठा आरक्षण महामोर्चासाठी बैठक संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी): येत्या ८ नोव्हेंबरला परांडा (जि. धाराशिव) येथे मराठा आरक्षणासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी नेरले (ता. करमाळा) येथे काल ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता एका मंदिरामध्ये उद्बोधन वर्ग संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांनी मराठा आरक्षणाविषयी आपापली मते प्रगट केली.

बैठकीचे प्रास्तविक करताना आरक्षणाची गरज मराठा समाजाला कशी महत्त्वाची आहे हे शिंदे गुरुजी यांनी समाज बांधवांना सविस्तर सांगितले.

त्याचबरोबर सूर्यवंशी सर यांनी आरक्षण मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी  व त्यावरती आपण कोणती रणनीती आखली पाहिजे हे सांगितले. प्राध्यापक धनंजय पन्हाळकर यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असून देखील आरक्षण नसल्यामुळे उच्च शिक्षण घेता येत नाही अशी खंत व्यक्त केली. तेव्हा पुढच्या पिढीला तरी आरक्षणाचा फायदा व्हावा म्हणून मोठ्या संख्येन सहभागी व्हावे असे आव्हान केले. या कार्यक्रमाला नेरले गावातील मराठा समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!