केत्तूर नं.२ येथे एकाचवेळी तीन ठिकाणी चोरी - २१ हजाराचा ऐवज लंपास - Saptahik Sandesh

केत्तूर नं.२ येथे एकाचवेळी तीन ठिकाणी चोरी – २१ हजाराचा ऐवज लंपास

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : केत्तूर नं.२ (पारेवाडी स्टेशन) येथे एकाचवेळी एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी होऊन चोरट्यांनी २९ हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार ३१ ऑक्टोबरच्या रात्री घडला आहे. या प्रकरणी नवनाथ विनायक, फाळके (रा.पोमलवाडी) यांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली. 

त्यात त्यांनी  म्हटले आहे, की माझे केत्तूर नं.२ (पा.रे.) येथे कमलाई कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. ३० ऑक्टोबरला रात्री नेहमीप्रमाणे साडेआठ वाजता दुकान बंद करून घरी गेलो व ३१ ऑक्टोबरला सकाळी साडेआठ वाजता दुकान उघडण्यासाठी आलो असता, दुकानाचे लोखंडी शर्टरचे कुलूप उघडून गेलो असता दुकानाच्या वरील पत्रा उचकटलेला दिसला. तसेच दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यावेळी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. 

यामध्ये चोरट्यांनी पाच हजार रुपये किंमतीच्या दहा पेंन्टी व तीन हजार रूपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेरेचे डीव्हीआर, हार्डडीस्क पळवून नेले आहे. तसेच माझे चुलत भाऊ लखन बलभीम फाळके यांचे फाळके मशनरी स्टोअर्स हे दुकान त्यांनी सकाळी उघडले असता, त्यांनाही दुकानातील सामान, अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांच्या दुकानातील आठ हजार रूपये किंमतीचे तीन स्टार्टर, चार मेघा चोरी झाल्याचे निदर्शनास आले. 

तसेच शेजारीलच श्री किर्तेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था येथेही कोयंडा व कुलूप तोडून चोरी झाल्याचे लक्षात आले. पतसंस्थेतील मॅनेजर आबासाहेब पांडूरंग डोंगरे यांनी पतसंस्थेतील १३ हजार रुपये रोख रकम चोरी झाल्याचे सांगितले. अशाप्रकारे चोरट्यांनी एकूण २१ हजाराचा ऐवज एकाच दिवशी रात्री पळवून नेला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!