संभाजी ब्रिगेडच्यावतीने जेऊर येथील मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी आयोजित - Saptahik Sandesh

संभाजी ब्रिगेडच्यावतीने जेऊर येथील मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी आयोजित

केम(संजय जाधव) : समाजात हिंदू मुस्लिम द्वेषाचे वातावरण पसरत असताना जेऊर येथे मात्र हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन पाहायला मिळाले. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात. उपवास सोडण्यासाठी जेऊर येथील संभाजी ब्रिगेड या संघटनेच्यावतीने अलिफ मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेऊर व परिसरातील अनेक मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीला उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी बोलताना संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले की, काही समाजकंटक जातीजातीमध्ये, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करीत आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजकंटकांचा वापर करीत आहे. अनेक समाजकंटक चिथावणीखोर भाष्य करत द्वेष पसरवण्याचे काम करत असतात. अशा नकारात्मक परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल व्हावा या उद्देशाने आम्ही या इफ्तार पार्टीचे आयोजन दरवर्षी करत असतो.  जातीय सलोखा राखण्याचे काम गेली कित्येक वर्षापासून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ही संघटना काम करत आहे.

यावेळी या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, बाळासाहेब झोळ, निलेश पाटील, ता.अध्यक्ष सुहास पोळ, शहअध्यक्ष अतुल निर्मळ, पिंटू जाधव, आदिनाथ माने, धनंजय गारुडी, सचिन कसबे, सागर कोठावळे,सागर साखरे,अजित उपाध्ये,अविनाश घाडगे, विठ्ठल जाधव, बनकर, नाना साहेब पोळ,अशितोष कसबे आदि कार्यकर्ते व बहुसंख्येने सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!