सुरताल संगीत विद्यालयाच्या २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘रजत जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन – विविध पुरस्काराचे वितरण..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील सुरताल संगीत विद्यालया च्या २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘रजत जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी दिली.
हा कार्यक्रम ६ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता विकी मंगल कार्यालय,एस. टी. स्टॅन्ड, करमाळा समोर येथे होणार आहे. या कार्यक्रमात प्रतिभावंत कलाकारांचा ‘सुर सरस्वती’ पुरस्कार तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकिय क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘संगीत रसिक’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मुख्य कलाकार, आजी-माजी विद्यार्थी यांचा गायन, वादन, नृत्य आदी कला सादर करणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ संगीतप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य नरारे यांनी केले.