करमाळा नगरपरिषदेच्या प्रभाग १ व २ च्या विकासकामासाठी १ कोटी १२ लाख रुपये रुपये निधी मंजूर - माजी नगरसेवक संजय सावंत.. - Saptahik Sandesh

करमाळा नगरपरिषदेच्या प्रभाग १ व २ च्या विकासकामासाठी १ कोटी १२ लाख रुपये रुपये निधी मंजूर – माजी नगरसेवक संजय सावंत..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.९) : करमाळा नगरपरिषदेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान सन 2023- 24 या आर्थिक वर्षासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा परिषदेच्या प्रभाग १ व २ मधील विकास कामांसाठी 1 कोटी 12 लाख 9,354 रुपये मंजूर झाले असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय सावंत यांनी दिली.

करमाळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व सावंत गटाचे नेते संजय सावंत यांनी आतापर्यंत अनेक विकासकामे केलेली आहेत, सध्या आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा परिषदेच्या प्रभाग १ व २ मधील विकास कामांसाठी हा निधी मंजूर झाला असल्याचे श्री.सावंत यांनी सांगितले. करमाळा शहरातील प्रभाग १ व २ मधील गणेश बोरा घर ते पिंटू बेग घर रस्ता डांबरीकरण करणे यासाठी ६,१७,७५० रुपये तसेच गणेश बोरा घर ते पिंटू बेग घर गटार बांधकाम करणे ३१,८९,००२ रूपये, मोहल्ला गल्ली येथील विविध परिसरात गटार बांधकाम करणे ५०,२८,२६८ रुपये, सावंत गल्ली येथील सार्वजनिक शौचालय परिसर सुशोभित करणे २४,६४,३४४ रुपये या प्रकारचे विविध विकासकामे होणार आहेत. माजी नगरसेवक संजय सावंत यांनी विशेष पाठपुरावा करून हा निधी आणल्यामुळे त्यांचे शहरात कौतुक होत आहे.

करमाळा शहराच्या विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार असून आमदार संजयमामा शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली आणखी निधी उपलब्ध करून विकासकामे करणार आहे, नागरिकांनीही आपल्या अडीअडचणीसाठी माझ्याशी संपर्क साधावा, त्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील.. – श्री.संजय सावंत (माजी नगरसेवक, करमाळा नगरपरिषद)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!