रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आ.शिंदे यांचा पश्चिम भागात दौरा.. - Saptahik Sandesh

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आ.शिंदे यांचा पश्चिम भागात दौरा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात प्रचार दौरा सुरु केला असून, या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे आमदार शिंदे गटाचे समर्थक सुजित बागल यांनी सांगितले आहे.

आज (ता.२७) केत्तुर, पारेवाडी, टाकळी, पोमलवाडी भागात हा दौरा असून, आज सकाळपासून नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन केलेल्या विकास कामांबद्दल माहिती दिली जात आहे. याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण तालुक्यात आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचारासाठी सक्रिय झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, डॉ.गोरख गुळवे, सूर्यकांत पाटील, राजेंद्र बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!