तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला ISO मानांकन प्राप्त – महाराष्ट्रातील पहिलेच कार्यालय

करमाळा(दि.३): करमाळा येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयास आंतराष्ट्रीय दर्जाचे IS0 90001 : 2015 मानांकन प्राप्त झाले आहे. असे मानांकन प्राप्त झालेले करमाळा कार्यालय हे महाराष्ट्रातील पहिलेच कार्यालय आहे. हे मानांकन दिनांक 31 मार्च 2025 ते 31 मार्च 2028 या कालावधीसाठी प्राप्त झाले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना हे मानांकन प्राप्त करताना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या विविध कामांची पाहणी करून देण्यात आले आहे. यामध्ये महाडिबिटी वर येणाऱ्या सर्व योजनामध्ये निधी वितरणात मागील सलग 3 वर्षे राज्यात प्रथम क्रमांक वर करमाळा तालुका आहे. केळी पीक क्षेत्र विस्तार व निर्यात हब साठी केलेले कार्य,ठिंबक सिंचन व यात्रीकरण मध्ये पुणे विभागात सर्वाच्य काम व अनुदान वाटप कार्य, शेतकरी व कर्मचारी यांचेसाठी शुद्ध जल, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी, मौखिक व लेखी मार्गदर्शन, शेतकरी अभिप्राय,कृषी ग्रंथालय,कृषी वस्तू संग्रहालय, अदयावत शेतकरी माहिती व प्रशिक्षण कक्ष,नगण्य प्रलंबितता,फ्लो चार्ट,माहिती चार्ट,अभिलेख वर्गीकरण,सुसज्ज बैठक व्यवस्था,प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यास आईच्या नावासह नाव निर्देशित प्लेट,सर्वांना आयकार्ड,सर्वधर्मसमभाव साठी एक गणवेश, तालुका कृषी अधिकारी कार्यक्षेत्रातील सर्व गावांचा अद्यावत मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये सुपीकता निर्देशांक चार्ट,अधिकारी कर्मचारी यांचे गावभेटीचे दिवस सह सूक्ष्म नियोजन,कृषी व शेतकरी कुटुंब सेवार्थ कार्य,राज्य व केंद्रशासन धोरण व योजना यांची उत्कृष्ट अंमलबजावणी,कार्यालय रंगरंगोटी, AI तंत्रज्ञान यांचा वापर इत्यादी अनेक बाबींची अंमलबजावणी नंतर सर्वेक्षण व अंकेक्षण ऑडिटवर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा मानांकन मिळवण्याचा मान या कार्यालयास प्राप्त झाला आहे.

हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी श्री अनिल चव्हाण, श्री मधुकर मारकड, श्री देविदास चौधरी, श्री काशिनाथ राऊत, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा करमाळा कार्यालयीन कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी जेऊरचे मधुकर मारकड आदी जणांचे योगदान लाभले.



