केम रेल्वे थांबा, उड्डाण पूल, ट्रान्सफॉर्मर,अप्पर तहसील कार्यालय आदी मागण्या केम करांनी खासदारांपुढे मांडल्या

केम (प्रतिनिधी – संजय जाधव) :केम ( ता.करमाळा) येथे माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या जनता दरबारात ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या. काही समस्या त्वरीत सोडविल्या तर काही सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर निवडून आल्यापासून प्रथमच केम येथे त्यांच्या उपस्थितीत येथील विठ्ठल मंदिरात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी माजी जिल्हा परिषद सदस्य जेष्ठ नेते दिलीप दादा तळेकर होते. यावेळी खासदार यांना प्रवासी संघटनेच्यावतीने केम येथील जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे केम रेल्वे स्टेशन वर कायम झालेल्या गाडयाचा थांबा रद्द केला त्यामुळे विद्यार्थी,प्रवासी कुंकू कारखानदार यांची गैर सोय झाली आहे. रेल्वे नसल्याने मुली महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

रेल्वे विभागाकडे निवेदन देऊनही त्याचा उपयोग झाला नाही. “तुम्ही आताच रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना फोन करा असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. त्यानतर खासदार साहेबानी रेल्वे मंत्र्यांना फोन वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु फोनवर संपर्क झाला नाही. त्यानंतर त्यांनी सोलापूर त्यानतर त्यानी मी स्वतः मंत्रालयात जाऊन रावसाहेब दानवेंची भेट घेऊन येथील प्रश्नः मांडेन असे आश्वासन त्यांनी दिले. प्रस्ताव आम्ही मुंबई ला पाटवला असे सांगितले.त्यानतर त्यानी मी स्वतः मंत्रालयात जाऊन रावसाहेब दानवेंची भेट घेऊन येथील प्रश्नः मांडेन असे आश्वासन त्यांनी दिले.
केम येथील अरूण लोंढे,बाळू तळेकर,दिपक सुरवसे यांनी केमला जोडणारा रस्त्याची परिस्थिती सांगितली. या वेळेस रस्त्याचे प्रश्नांसाठी करमाळा येथे बैठक लावू असे आश्वासन दिले.
केम येथील कुंकू कारखानदार संघटनेचे धनजंय सोलापूरे, मनोज सोलापूरे यांनी कारखान्यासाठी वीज कमी पडते या साठी पाच के.व्ही. ट्रान्सफाॅर्मरची मागणी केली. तसेच जिल्हा परिषद शाळेजवळील धोक्याचा डिपी त्वरीत काढून दुसऱ्या ठिकाणी बसवावा,अशीही मागणी शिक्षकांनी केली. यावर खासदार नाईक निंबाळकर यांनी वीज वितरण अधिकारी यांना सूचना दिल्या.
वडार समाजासाठी खासदार निधीतून व्यायाम शाळेतील साहित्यासाठी व विकास कामांसाठी तीस लाख रुपये मंजूर केले.
प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पिंटू ओहोळ यांनी केम हे करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे शहर गाव आहे या गावापासून तालुक्याचे अंतर 32 कि.मीअंतरावर आहे. त्यामुळे जेष्ट नागरिकांची गैरसोय होती. तरी केम येथे अप्पर तहसिल कार्यालय व्हावें असा प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न त्वरीत मंजूर करु या वेळी श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल चे प्राचार्य कदमसर व अमोल तळेकर यानी शाळेचे निवेदन दिले काहि छोटे प्रश्न जागेवर मिटविले.

या वेळी कोव्हिड काळामध्ये केम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष पालखे यांनी आदर्श काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार खासदार निंबाळकर यांनी केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप,दादा तळेकर म्हणाले आमच्या गावाची एकच मागणी ती म्हणजे रेल्वेचे थांबे पुर्ववत करणे व केम येथे रेल्वे उड्डाणपूल हे दोन प्रश्न खासदार साहेबानी सोडवावे. आम्ही पुन्हा त्याना खासदार म्हणून निवडून देऊ. केमचे प्रश्न खासदार साहेब मार्गी लावतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर करमाळा भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, किरण बोकण, केम शहराध्यक्ष गणेश आबा तळेकर, उपाध्यक्ष दत्ता तळेकर, युवा सेनेचे सागर तळेकर, कुंकू कारखानदार राजेंद्र गोडसे, ऊपस्थित होते या जनता दरबारात कुंकू, कारखानदार,व्यापारी वर्ग ग्रामपंचायत सदस्य सर्व विभागाचे अधिकारी, गावातील सर्व संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी पोलीस प्रशासन उपस्थित होते.