वैभवराजे जगतापांनी केला संतोष वारे यांचा सत्कार
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : : कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष वारे यांचा सत्कार वैभवराजे जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी राष्ट्रवादी किसान सेलचे तालुका अध्यक्ष सचिन नलवडे-पाटील, सचिव विठ्ठल क्षीरसागर, महिपत देमुंडे, रविंद्र उकिरडे, सचिन अब्दुले सर, महेश ढाणे, सुरेश भांडवलकर, वसंत बरडे, अमोल नलवडे, प्रसाद क्षीरसागर, श्रीकांत शिंदे उपस्थित होते. तसेच सरकार मित्र मंडळा तर्फे संतोष वारे यांचा आमदार निलेश लंके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी युवकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.