आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करमाळा व चिखलठाण रक्तदान शिबिरात 127 रक्तदात्यांनी केले रक्तदान - Saptahik Sandesh

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करमाळा व चिखलठाण रक्तदान शिबिरात 127 रक्तदात्यांनी केले रक्तदान

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.५) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरामध्ये 89 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर चिखलठाण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले, दिवसभरात एकूण 127 रक्तदात्यांनी आज रक्तदान केले.

करमाळा येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे हस्ते करण्यात आले.

आमदार संजयमामा शिंदे यांनी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथील रक्तदान शिबिराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उद्धव दादा माळी, दादासाहेब जाधव, सुभाष अभंग, चंद्रहास निमगिरे, महेश सोरटे ,चंद्रकांत काका सरडे ,विलास पाटील ,राजेंद्र पवार ,रवींद्र वळेकर,सुजित तात्या बागल, एड. राहुल सावंत ,तात्यासाहेब मस्कर, समाधान दौंड, संजय जाधव , जगदाळे साहेब, अशपाक जमादार, बापू काळे , तुषार शिंदे, सुरज ढेरे , डॉ. विकास वीर आदी उपस्थित होते.

चिखलठाण नंबर 1 येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन माढा विधानसभा मतदारसंघाचे आ. बबनदादा शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्रकुमार बारकुंड यांचेसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

S.K. collection bhigwan
Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!