करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न - Saptahik Sandesh

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत देशाच्या 75 वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहन सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांच्या हस्ते तर उपसभापती चिंतामणी जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर स्व.देशभक्त नामदेवरावजी जगताप व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदकुमार ढेरे,अमोल झाकणे,संतोष वारे तसेच सचिव विठ्ठल क्षिरसागर, रविंद्र उकीरडे,महेश ढाणे,रतन काळे,वसंत बरडे,श्रीकांत शिंदे,सुरेश भांडवलकर ,अमोल नलवडे आदी कर्मचारी व कांही व्यापारी,हमाल,व्यवसाईकदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!