सावडी येथून करमाळा येथे कॉलेजला आलेली १६ वर्षाची तरुणी बेपत्ता - Saptahik Sandesh

सावडी येथून करमाळा येथे कॉलेजला आलेली १६ वर्षाची तरुणी बेपत्ता

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सावडी (ता.करमाळा) येथून करमाळा येथे कॉलेजला आलेली १६ वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे, हा प्रकार १९ ऑक्टोबर रोजी करमाळा येथील कॉलेजमध्ये घडला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी तरुणीच्या आजोबांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले की, माझ्या मुलीच्या मुली माझ्याकडे शिक्षणासाठी असून माझ्या दोन्ही नाती करमाळा येथील कॉलेजला जातात. माझी नात हि दररोज सकाळी 9.30 वा. एस. टी. बसने तिच्या शाळेमध्ये जात असे व सायंकाळी 6.00 वा.च्या आसपास एस. टी. बसने परत येत असते १९ ऑक्टोबरला सकाळी 9.30 वाच्या सुमारास माझी नात माझे घरून करमाळा येथील महाविद्यालयात गेली होती.

दुसरी नात ही १९ ऑक्टोबरला सकाळी 8.30 वा करमाळा येथे शाळेमध्ये गेलेली होती, मी घरीच होतो. दुसऱ्या नातीचा दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास माझ्या मुलाच्या फोनवर फोन आला व तिची बहिण सगळीकडे शोधली पण कुठेच भेटली नाही, असे सांगितले. पोलिस याबाबत माहिती घेत असून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!