शेतातील चिलारीची झाडे काढण्याच्या वादातून काठीने मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी:
खांबेवाडी येथे शेतातील चिलारीची झाडे काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघा भावांना काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना २२ जुलै रोजी दुपारी घडली.

किरण हाके त्यांचा भाऊ गणेश हाके हे शेतातील चिलारीची झाडे काढण्यासाठी गेले होते. दुपारी एकच्या सुमारास ते शेताजवळील रस्त्यावर थांबले असताना अजिनाथ शेळके, गोरख महादेव हाके, धनंजय अजिनाथ शेळके व बडाबाई अजिनाथ शेळके तेथे येऊन ‘तुम्ही शेतातील चिलारीची झाडे का काढता, हे शेत आमचे आहे,’ असे म्हणत संबंधितांनी दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी अजिनाथ शेळके यांनी हातातील लाकडी काठीने किरण यांच्या डाव्या मनगटावर व बोटावर मारून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या गणेश यांनाही काठीने मारहाण करण्यात आली.

तसेच गोरख हाके, धनंजय शेळके व बडाबाई शेळके यांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.


