तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समितीच्यावतीने मोफत डोळे तपासणी शिबीर - 90 रुग्णांची तपासणी - 28 रुग्ण बुद्रानी हॉस्पिटलमध्ये ऑपेरेशनसाठी रवाना.. - Saptahik Sandesh

तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समितीच्यावतीने मोफत डोळे तपासणी शिबीर – 90 रुग्णांची तपासणी – 28 रुग्ण बुद्रानी हॉस्पिटलमध्ये ऑपेरेशनसाठी रवाना..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज (ता.२७) मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटलचे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून २८ रुग्ण बुद्रानी हॉस्पिटल पुणे येथे ऑपेरेशनसाठी रवाना झाले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून अर्बनं बँकेचे संचालक रामदास जाधव, तसेच जैन श्रावक संघांचे अध्यक्ष चंद्रकांत कटारिया, गोसेवा समितीचे कचरूकाका मंडलेचा यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्रेणिक खाटेर म्हटले कि, आतापर्यंत अनेक रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला बायपास चौक,देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे असेही सांगितले.

या प्रसंगी बोलताना अर्बन बँकेचे संचालक रामदास जाधव यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.विजयसिंह परदेशीं यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले.तसेच दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने अरुण टांगडे यांनी खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून दत्त पेठ तरुण मंडळाचे त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले.यावेळी देविदास नस्ते यांनी आजच्या व येथून पुढील प्रत्येक शिबिरात रुग्ण व उपस्थितासाठी चहा पाण्याची व्यवस्था करणार असल्याचे जाहीर करून आज याची सुरवात केली..

या शिबिरासाठी जगदीश शिगची, भाजपा चे विठ्ठल राव भनगे, अर्जुन इंदुरे, मुन्ना काझी, नारायण तात्या पवार, दिनेश भांडवलकर,योगेश मुथा,पोपटराव काळदाते, रमेश घाडगे, वैभव दोशी, सचिन गांधी,रसिक जी मुथा,विश्वास काळे, वृंदा कुलकर्णी, दिनेश मुथा, केतन संचेती, गणेश बोरा,अनंत मसलेकर, गिरीश शहा, विजय बरीदे,अमोल काळदाते, प्रवीण गंधे, अभय शिंगावी, प्रीतम राठोड,यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमच्या प्रसंगी वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले..

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!