संजय सरवदे यांना 'नॅशनल ग्रेट अचीवर्स अवार्ड' या पुरस्काराने केले सन्मानित - Saptahik Sandesh

संजय सरवदे यांना ‘नॅशनल ग्रेट अचीवर्स अवार्ड’ या पुरस्काराने केले सन्मानित

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : घारगाव (ता. करमाळा) या गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शेतकरी पुत्र फाउंडेशन मार्फत दिला जाणारा नॅशनल ग्रेट अचिवर्स अवॉर्ड 2022 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अहमदनगर येथील शेतकरी पुत्र फाउंडेशनने यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा नगर येथे रेडियन्स हॉटेलमध्ये आयोजित केला होता. या सोहळ्यामध्ये कृषी, उद्योजक, शैक्षणिक, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांना नॅशनल ग्रेट अचिवर्स अवॉर्ड 2022 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री. सरवदे यांनी गेल्या अनेक वर्षभरापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पद्यश्री राहीबाई पोपरे (बीजमाता) ,पद्मश्री पुरस्कार विजेते मा.पोपटराव पवार (आदर्श सरपंच) हिवरे बाजार, कैलास राऊत, किशोर भणगे अध्यक्ष युवा काँग्रेस नेवासा यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन संजय सरवदे यांना गौरवण्यात आले.

यावेळी शेतकरी पुत्र फाउंडेशन अहमदनगर महाराष्ट्र संस्थापक, अध्यक्ष अनिकेत अशोक शेळके, उपाध्यक्ष, कृष्णा पाठक, सचिव रोहन ढेरे ,सहसचिव सौरभ निकम, सल्लागार ऋषिकेश पाठक, खजिनदार शुभम सुद्रिक, घारगाव च्या ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी संजय सरवदे, पुरस्कार्थी, अनेक मान्यवर पाहुणे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!