शेटफळचा श्रावण महोत्सव - नामवंत भारुडकरांचे विविध विषयावर प्रबोधन - ग्रामदैवत नागराजाचे प्रत्यक्ष दर्शनाने भाविकांचा उत्साह द्विगुणीत - Saptahik Sandesh

शेटफळचा श्रावण महोत्सव – नामवंत भारुडकरांचे विविध विषयावर प्रबोधन – ग्रामदैवत नागराजाचे प्रत्यक्ष दर्शनाने भाविकांचा उत्साह द्विगुणीत

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.६) : शेटफळ (ना) (ता.करमाळा) येथील श्रावण सप्ताहाच्या
कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामवंत भारुडकरांनी विविध विषयावर प्रबोधन करून आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली तर या कार्यक्रमाच्या वेळी ग्रामदैवत नागराजाचे प्रत्यक्ष दर्शनाने भाविकांचा उत्साह आणखी द्विगुणीत झाला होता.

सकाळी नागनाथ मंदिरातून टाळ मृदंगाच्या जयघोषात देवाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली, वारकरी ज्ञानदेव-तुकाराम नामघोष करत ठेका धरत होते, या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. प्रतिवर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून शेटफळ येथील नागनाथ देवाच्या श्रावण उत्सवाला सुरुवात होते.

पंचमी दिवशी पारंपरिक पद्धतीने जिवंत नागाची पूजा करून पंचमी साजरी केली जाते, श्रावणी आष्मीला या उत्सवाची सांगता होते. यावेळी भारूडाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, यावर्षी शुक्रवारी ता ५ ऑगस्ट रोजी झालेल्या भारुडाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सोलापूर सातारा उस्मानाबाद अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत भारुड करांनी हजेरी लावून आपली कला सादर केली.

या कार्यक्रमाच्यावेळी या गावचे ग्रामदैवत नागराज याचे दर्शन उपस्थितांना झाले, या गावांमध्ये नागोबाला मारले जात नाही, त्यांची पूजा केली जाते. या कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित लोकांनी जिवंत नागाचे दर्शन घेऊन हा उत्सव साजरा केला. या कार्यक्रमाला या परिसरातील महिला व पुरुष भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Yash collection karmala clothes shop advertise
S.K. collection bhigwan
Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!