विहाळच्या माजी सरपंच द्वारकाबाई गाडे यांचे निधन - Saptahik Sandesh

विहाळच्या माजी सरपंच द्वारकाबाई गाडे यांचे निधन

Dwarkabai Gade Vihal

करमाळा,ता.10: विहाळच्या माजी सरपंच द्वारकाबाई ज्ञानदेव गाडे (वय-89) यांचे नुकतेच वृध्दपकाळाने रहात्या घरी निधन झाले आहे.त्यांच्या मागे 3 मुले 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ठाणे येथील पाटबंधारे विभागाचे उप अभियंता, गौतम गाडे तसेच डी आर माने महाविद्यालय,कागल, येथील प्राध्यापक डॉ. आदिनाथ गाडे, तसेच विहाळ येथील माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक मुख्याध्यापक पंढरीनाथ गाडे यांच्या त्या मातोश्री तर यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड येथील प्राध्यापिका मीना आदिनाथ गाडे यांच्या सासुबाई होत्या. त्यांच्या रक्षा विसर्जना वेळी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन वृक्षारोपणासाठी झाडांसाठी खड्डे खोदून त्यामध्ये रक्षा विसर्जित करून विविध विविध प्रकारची फळझाडे लावण्यात आली आहे.

Dwarkabai Gade Death News | Dwarkabai Gade Vihal | Karmala News | Saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!