छत्रपती शाहू महाराज जयंती व मोहरमनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप

करमाळा(प्रतिनिधी):छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती आणि मोहरम सणाच्या निमित्ताने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवजयंती उत्सव समिती तसेच बहुजन विचारवादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांना फळे व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतिजा वेदपाठक यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जयघोष केला. भीमराव लोंढे यांनी जिजाऊ वंदना सादर केली.

यावेळी टीव्ही ९चे पत्रकार शितलकुमार मोटे, नासीर कबीर, अशपाक सय्यद, सचिन जव्हेरी, सिद्धार्थ वाघमारे, विशाल घोलप, प्रफुल्ल दामोदरे, अंगद भांडवलकर, विशाल परदेशी, आलिम शेख, आयुब शेख, तुषार जाधव, प्रशांत भोसले, हर्षवर्धन गाडे, सुनील भोसले, अशोक मुरूमकर आदी पत्रकारांच्या हस्ते रुग्णांना फळे व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
समतेचा व सामाजिक ऐक्याचा संदेश
मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी संघटनेच्या समतेच्या विचारांवर प्रकाश टाकत महापुरुषांच्या विचारांचा वारसा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढील काळातही समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.


यावेळी टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, पंचायत समिती सदस्य भरत अवताडे, नगरसेवक महादेव फंड, फारूक जमादार, सचिन अब्दुल्ले, सचिन गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे, प्रा. नागेश माने, नवनाथ राखुंडे, ज्योतीराम लावंड, मनसेचे उपजिल्हाप्रमुख नानासाहेब मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमीरशेठ तांबोळी, शिवसेना शहरप्रमुख पंकज परदेशी, अजय कांबळे, गजानन ननवरे, आझाद शेख, सुरज शेख, सोहेल पठाण, जमीर सय्यद, अशपाक जमादार, मुस्तकीन पठाण, गणेश कुकडे, मोबीन बागवान यांच्यासह विविध क्षेत्रांतील हिंदू-मुस्लिम नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सचिन काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

