आमदार म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडत आहे विरोधकांच्या टिकेला मी कामानेच उत्तर देईल – आमदार नारायण पाटील

केम(संजय जाधव) : मी आमदार म्हणून माझी जबाबदारी पार पाडत असताना विरोधकांच्या टिकेला कामानेच उत्तर देईल रोपळे केम कंदर कन्हेरगाव या रस्त्याच्या प्रश्न मार्गी लावला आहे याचे श्रेय घेण्याचा विरोधक प्रयत्न करीत आहे याची मी दखल घेत नाही असे प्रतिपादन आमदार पाटील यांनी केले.
रोपळे केम कंदर कन्हेरगाव हा सुमारे २५ कि मी अंतर असलेला रस्ता साठी एबीडी योजनेकडून २०० कोटी रूपयाचा निधी मंजूर झाल्यानंतर केम ग्रामस्थांच्या वतीने जेऊर (ता.करमाळा) येथे आमदार पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी अजित तळेकर पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर बिचितकर, युवा नेते पृथ्वीराज पाटील ग्रामपंचायत सदस्य अनंता तळेकर , नागनाथ तळेकर, शिवसेनेचे श्रीहरी तळेकर, प्रकाश तळेकर,सतीश खानट सरपंच प्रतिनिधी राहुल कोरे शौकत मुलानी कांतीलाल पळसे, मनोज घोषे, तात्यासाहेब गोडगे कुंडलिक देवकर नागनाथ दौंड, दत्ता तळेकर किरण तळेकर समीर दादा तळेकर प्रशांत बिचितकर सचिन बिचितकर ज्यालिंदर तळेकर दिपक तळेकर दिलवर पठाण अशोक केंगार आण्णासाहेब तळेकर अमोल गायकवाड दादा तळेकर आणा तळेकर सुदामा तरंगे सुग्रीव शिंदे हंबीरराव गोरे किरण खरवडे भैय्या बिचितकर आदि उपस्थित होते

आमदार नारायण पाटील पुढे बोलताना म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर यश आले. या रस्त्यामुळे करमाळा व माढा तालुक्यातील अनेक गावांना दळणवळणची सोय होणार आहे. तसेच केम येथील कुंकू उद्योगाला चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना आपला कृषीमा ल मार्केटला नेण्यासाठी सोय होणार आहे.
दहिगाव ऊपसा योजनेचे पाणी वडशिवणे तलावात आणण्याचे काम तुम्ही मला आमदार केल्यामुळे काम करू शकलो. विरोधकांच्या हाती काही काम नसल्याने ते सतत टिका करीत आहे. या टिकेला मी घाबरत नाही मी कामाने चे उत्तर देणार केम जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातून जनतेने त्यांची जागा दाखवून दिली
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील तळेकर यांनी केले तर जि,प सदस्य प्रतिनिधी अजित तळेकर यांनी आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली तर आभार नागनाथ तळेकर यांनी मानले या कार्यक्रमासाठी केम व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या रस्त्याची खरी गरज कुंकू कारखानदार यांना होती. त्यांची रस्त्याची कायम मागणी होती. परंतु रस्ता मंजूर झाला तर या कार्यक्रमासाठी कुंकू कारखानदार उपस्थित राहिले नाहित त्यामुळे याची नागरिकांतून चर्चा सुरू आहे.

