कुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आकर्षक गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – कुगाव (ता.करमाळा) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने प्रथमच आकर्षक गौरी सजावट स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सुवर्णा पोरे यांनी दिली.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असून ही स्पर्धा फक्त कुगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत नागरिकांसाठी आहे. स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस- चांदीचा गणपती, द्वितीय बक्षीस – पैठणी साडी, तृतीय बक्षीस – नथ व उत्तेजनार्थ – आकर्षक भेटवस्तू असणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांनी अगोदर नाव कुगाव ग्रामपंचायतीकडे नावनोंदणी करून घ्यावी.

